महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
कोतवाल संवर्ग पदभरती प्रक्रिया - २०२६
नाशिक जिल्ह्यातील विविध उपविभागांतर्गत रिक्त असलेल्या कोतवाल पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या सूचना व नवीन घोषणा (Latest Announcements & Notices)
ताज्या सूचना लोड होत आहेत...
पदाची माहिती व पात्रता निकष (Eligibility & Post Information)
शैक्षणिक अर्हता
उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला).
वयोमर्यादा
अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे.
स्थानिक रहिवासी
उमेदवार ज्या सज्जातील गावासाठी अर्ज करत आहे, त्या संबंधित गावाचा / सज्जाचा स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे.
शारीरिक सक्षमता
उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ व सक्षम असावा, तसेच सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना (Important Guidelines)
- १. अर्ज प्रक्रिया: अर्जदाराने ऑनलाइन अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व इंग्रजीतून भरणे आवश्यक आहे.
- २. कागदपत्रे अपलोड: फोटो व स्वाक्षरी JPG/PNG स्वरूपात तर जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व रहिवासी दाखला हे PDF (कमाल २०० KB) स्वरूपात अपलोड करावेत.
- ३. परीक्षा शुल्क व पेमेंट: ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर बँक खात्यातून रक्कम वजा झाल्यास किमान २४ तास प्रतीक्षा करावी, तत्काळ दुबार पेमेंट करू नये.
- ४. अर्जाची प्रत (Reprint): अर्ज यशस्वीरीत्या जमा झाल्यानंतर 'Reprint Application' पर्यायावरून अर्जाची छापील प्रत जपून ठेवावी.
- ५. प्रवेशपत्र (Admit Card): लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.